अहमदनगर :- विधानसभा निवडणुकीत नगर, कर्जत-जामखेड आणि पारनेर विधानसभा मतदारसंघात भाजप व शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला. जिल्ह्यात भाजपचे निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आलेले आहेत. त्यामुळे मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिलेले नाही. त्यामुळे मूळ कार्यकर्त्यांना नवसंजीवनी द्यावी, अशी मागणी हिंदू राष्ट्र सेनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर गेंट्याल यांनी केली आहे.
गेंट्याल यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे अध्यक्ष उद्धव ठाकरे, तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून ही मागणी केली आहे.
गेंट्याल यांनी म्हटले आहे, जिल्ह्यात पहिला भगवा नगर शहर आणि कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये फडकला. पाठोपाठ राहुरीच्या पोटनिवडणुकीत आणि पारनेरमध्येही भगवा फडकला. परंतु आता तिन्ही मतदारसंघांत भाजप आणि शिवसेनेच्या उमेदवारांचा पराभव झाला असून त्याची कारणे हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे.

निवडून आलेले तिन्ही आमदार काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपत आले आहेत. सध्या मूळ भाजप आणि शिवसेनेचे जिल्ह्यात अस्तित्वच राहिले नाही. हा विषय गंभीर आणि चिंतनाचा, तसेच चिंतेचा आहे. हिंदू राष्ट्र सेनेचे संस्थापक अध्यक्ष धनंजय देसाई देशात आणि राज्यात हिंदुत्वाचेच सरकार असावे, असे कार्यकर्त्यांना नेहमीच बजावत आले आहेत.
त्यासाठी भाजप आणि शिवसेनेला नवसंजीवनी देण्याची गळ आपण घालत असल्याचे गेंट्याल यांनी म्हटले आहे. विधान परिषद सभासदत्व आणि महामंडळांवर एकनिष्ठ कार्यकर्त्यांना संधी देऊन पक्षांना नवसंजीवनी द्यावी, अशी गेंट्याल यांची मागणी आहे.
- पुण्यातील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी ! 15 जानेवारीपासून ‘या’ 17 रेल्वे गाड्या रद्द, कोणाला बसणार फटका
- 2026 चा पावसाळा दगा देणार, एल निनोमुळे दुष्काळ पडणार ! Skymet चा अंदाज काय सांगतो?
- शेअर मार्केटमधील अस्थिरता रिलायन्स समूहाच्या ‘या’ शेअर्ससाठी वरदान ! मुकेश अंबानीचा स्टॉक व्हेनेझुएला संकटात पण सुपरहिट
- फोन पे , गुगल पे वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! चुकीच्या UPI आयडीवर पैसे पाठवल्यास ते पैसे परत कसे मिळवायचे ? पहा….
- गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी ! 400 रुपयांचा शेअर 40 रुपयांना ; ‘या’ तारखेपर्यंत Share खरेदी केल्यास मिळणार लाभ













