कोण आहे बाळ बोठे? कसा झाला बाळ बोठे हिरो आणि झिरो….

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- अहमदनगर पोलिसांनी तातडीने तपास करत रेखा जरेंच्या मारेकऱ्यासह 5 आरोपींना अटक केली. मात्र, या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार बाळासाहेब बोठे फरार होता.

गेल्या महिनाभरात बाळ बोठेवर सुपारी, हत्या आणि विनयभंग असे ३गुन्हे दाखल आहेत. रेखा जरे यांच्या हत्येला तीन महिने उलटल्यानंतरही बाळ बोठेला पकडण्यात पोलिसांना अपयश आल्याने रेखा जरे यांचे कुटुंबीय आमरण उपोषणाला बसले होते.मात्र अखेर आज सकाळी बाळ बोठे यास पोलिसांनी अटक केली आहे.

कोण आहे बाळ बोठे?  बाळ बोठे अहमदनगर मधील दैनिक सकाळ ह्या एका नामांकित वर्तमानपत्रात संपादक म्हणून कार्यकर्त होता. मात्र रेखा जरे यांची हत्या झाल्यानंतर त्याची त्या पदावरून हकालपट्टी करण्यात आली.

आणि बाळ बोठे हिरो झाला : सुरवातीला बाळ बोठे क्राईम रिपोर्टर म्हणून काम करत होता. त्यामुळे पोलिसांशी जवळचा संबंध आला. गुन्हेगारी विश्व कसं आहे? त्यातील खाचाखोचांची माहिती बाळा बोठेला मिळू लागली. हेच करता करता तो शोध पत्रकारितेकडे आला आणि गुन्हेगारी विश्वात शोध पत्रकारितेची धार त्याने आजमावली.

त्यात जातेगावच्या घाटाच्या पायथ्याशी असलेल्या घाटवाडीत अवैधपणे गावठी दारु बनवणं सुरु असल्याचा त्याला समजलं. लेखणीच्या धारेचा वापर त्याने हे प्रकरण उघडकीस आणण्यासाठी केला. ही बातमी वर्तमानपत्रात छापून आली आणि जिल्ह्यात एकच खळबळ माजली. इथूनच बाळ बोठे हिरो झाला.

आणि बाळ बोठे पुन्हा झिरो झाला :- रेखा भाऊसाहेब जरे यांची 30 नोव्हेंबरला हत्या झाली होती. राजकीय क्षेत्रातील महिलेची भरदिवसा भररस्त्यात कुटुंबीयांसमोर हत्या झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती. ह्या हत्याकांड प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून बाळ बोठेचे नाव आले आणि बाळ बोठे च्या एकंदरीत प्रवासास उतरती कळा सुरू झाली.

ह्या कारणामुळे झाली हत्या :- दरम्यान मनोज पाटील यांनी अशी माहिती दिली आहे की, चार्जशीटमध्ये म्हटल्यानुसार बदनामीच्या भीतीतून हत्या केल्याचा संशय आहेत. जरे तक्रार दाखल करतील, गुन्हा दाखल करतील अशी भीती बाळ बोठेला होती. अशी भीती बोठेला का होती, याबाबत पोलिसांनी उत्तर देण्याचे टाळले आहे. याबाबत अधिक तपास सुरू असल्याचं पोलीस अधिक्षक म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर

 

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe