अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- यशस्वीनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येचा मुख्य सुत्रधार बाळ बोठे अखेर पोलिसांच्या गळाला लागला आहे.यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्याकांडातील फरार मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला पोलिसांनी हैदराबाद येथे ताब्यात घेतले आहे
अतिशय नियोजबद्ध पद्धतीने बोठे याने जरे यांच्या हत्येचा कट रचला होता. मात्र पोलिस तपासात बोठेचे नाव निष्पन्न झाल्यानंतर त्याचा पैसा तसेच पोलिस दलातील असलेला त्याचा दबदबा कामाला आला नाही. सर्व फासे उलटे पडू लागल्याने हतबल झालेला बाळ अखेर पोलिसांच्या गळाला लागला. रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे याला अखेर अहमदनगर पोलिसांनी हैद्राबाद येथून अटक केली आहे . बाळ बोठे मागच्या ३ महिन्यापासून फरार होता
अहमदनगर पोलिसांनी पत्रकार बाळ बोठे बरोबरच राजशेखर अंजय चाकाली, (रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद,तेलंगाना) ,शेख इस्माईल शेख अली, वय ३० वर्षे, (रा. खुबा कॉलनी, शाईन नगर, बालापुर,सरुरनगर, रंगारेड्डी, तेलंगाना) अब्दुल रहमान अब्दुल आरीफ, वय ५२ वर्षे, (रा. चारमीनार मस्जीद, पहाडी शरीफ, सुरुर नगर, रंगारेड्डी, तेलंगाना) , महेश वसंतराव तनपुरे, वय ४० वर्षे, धंदा व्यवसाय, (रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, सावेडी) या चार आरोपीना दि. १२ मार्च २०२१ रोजी अटक करून त्यांना पारनेर न्यायालयात हजारी केला असता न्यायालयाने दि. १६ मार्च २०२१ पर्यंत पोलीस कस्टडी दिली आहे .
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी कि आज दि.१३ मार्च २०२१ रोजी सुपा पोलीस स्टेशन गु.र.नं. १४.७८/२०२० भारतीय दंड विधान संहिता कलम ३०२,१२० (ब),२१२,३४ अन्वये दाखल गुन्हयाचे तपासात प्राप्त तांत्रीक पुराव्यावरुन गुन्हयातील आरोपी नामे बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे,रा.बालिकाश्रम रोड,कमलनयन हॉस्पिटल समोर, अहमदनगर हा फरार असतांना
त्यास यातील आरोपी नामे (१) बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे, रा, बालीकाश्रम रोड, कमलनयन हॉस्पिटल समोर, अहमदनगर (२) जर्नादन अकुला चंद्राप्पा, रा. १४-११३, फलॅट नं. ३०१, श्री त्रिवेनी निवास, रामनगर, पी अॅण्ड टी कॉलनी, सारोमानगर, रंगारेड्डी, हैद्राबाद, तेलंगाना,(३) पी अनंतलक्ष्मी व्यंकटम सुब्बाचारी, रा. हैद्राबाद,तेलगाना, (फरार) (४) राजशेखर अंजय चाकाली, वय २५ वर्षे, रा. गुडुर करीम नगर, मुस्ताबाद, आंध्र प्रदेश. (तेलंगाना)
(५) शेख इस्माईल शेख अली, वय ३० वर्षे, रा. खुबा कॉलनी, शाईन नगर, बालापुर,सरुरनगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश, (तेलंगाना) (६) अब्दुल रहमान अब्दुल आरीफ, वय ५२ वर्षे, रा. चारमीनार मस्जीद, पहाडी शरीफ, सुरुर नगर, रंगारेड्डी, आंध्रप्रदेश. (तेलंगाना) (७) महेश वसंतराव तनपुरे, वय ४० वर्षे, धंदा व्यवसाय, रा. कुलस्वामीनी गजानन हौसिंग सोसायटी, नवले नगर, गुलमोहर रोड, सावेडी, अहमदनगर
पैकी यातील आरोपी क्रमांक ०४ ते ०६ यांना काल दि.१२ मार्च २०२१ रोजी अटक करण्यात आली असुन त्याच मा.पारनेर न्यायालयाने दि.१६/०३/२०२१ पावेतो पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे. ०१,०२ व ०७ यांना ताब्यात घेण्यात आले असुन पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|