बाळ बोठे फरार असताना ‘असे’ व्हायचे बायकोसोबत संभाषण !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ जगन्नाथ बोठे याला अखेर नगर पोलिसांनी शनिवारी पहाटे हैदराबाद येथून जेरबंद केले. अशी माहिती पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.

दरम्यान आता एका एका नव्या गोष्टींची माहिती समोर येत आहे, बाळ बोठे फरार असल्यापासून घरच्यांच्या संपर्कात कसा राहायचा ह्याची देखील माहिती समोर आली आहे. रेखा जरे यांच्या हत्याकांडातील तांत्रीक पुराव्यावरून गुन्हयातील फरार आरोपी बाळ उर्फ बाळासाहेब जगन्नाथ बोठे यास मदत करणारे हैद्राबाद येथील वकील जनार्दन अकुला चंद्राप्पा व नगरचा हॉटेल व्यवसायीक महेश वसंतराव तनपुरे यांना पारनेरच्या न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलिस कोठडी दिली.

पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार बोठे हा फरार झाल्यापासून एका गुन्हेगाराच्या मोबाईल नंबरवरून महेश तनपुरे याच्या मोबाईलवर दररोज संपर्कात होता. याच फोनवर बोठे व त्याची पत्नी दररोज संभाषण करीत.

दरम्यान गुन्हेगाराच्या मोबाईलवरून नगरमध्ये संभाषण होत असल्याची माहीती सायबर सेलकडून मिळाल्यानंतर गेल्या दिड महिन्यांपासून पोलिस बोठेे याच्या मागावर होते. बोठे हा फरार झाल्यापासून महेश तनपुरे याच्याशी संपर्कात होता. फरार झाल्यापासून सलग तिन आठवडे दररोज त्यांच्यात संभाषण होत असे.

बोठेची पत्नीही याच मोबाईवरून त्याच्याशी संपर्क करीत असे. बोठेला नगरमधील हालचालींची माहीती देण्यात येत होती. पुढे काय करायचे याबाबत बोठे पत्नीस मार्गदर्शन करीत असे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe