अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- हैदराबादच्या गुन्हेगारी परिसरातील एका हाॅटेलमध्ये वेशांतर करून लपून बसलेल्या बाळ बोठेला अटक करण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली पोलिसांनी बाळ बोठे यास हैदराबादमधून ताब्यात घेतलं आहे.
हे हत्याकांड प्रेम प्रकरणातून घडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. हा या प्रकरणातील मोठा ट्विस्ट मानला जात आहे. कारण गेल्या साडेतीन महिन्यांपासून बोठे फरार होता. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, अशी माहिती नगर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिली.
मुख्य सूत्रधार आरोपी बाळ बोठे याला अटक झाल्यानंतर रेखा जरे यांच्या मुलानं समाधान व्यक्त केलं. ज्या पद्धतीनं माझ्या आईची हत्या झाली, त्या आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी जरे यांचा मुलगा रुणाल जरे यांनी केली आहे. तसेच अहमदनगर मधील अॅड सुरेश लगड यांनीही बोठे याला कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे.
समाजात बाळ बोठे याची मोठी दहशत होती. वृत्तपत्राच्या माध्यमातून अनेकांना त्यानं त्रास दिला होता. पत्रकारितेचा गैरफायदा घेत त्यानं अनेकांचे संसार उद्ध्वस्त केले आहेत. त्यामुळं अशा आरोपींना कडक शिक्षा झाली पाहिजे, असं ते म्हणाले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|