अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:- नगर-जामखेड़ रस्त्यावर भरधाव वेगात ओव्हर टेक करण्याच्या नादात इको कारने (एम एच ०४, जे व्ही १८३१) दुचाकीस्वारास (एमएच १६, टी ८०८९) जोरदार धडक दिल्याने दुचाकी चालकाचा जागीच मृत्यु झाला. दरम्यान या अपघातात चिचोंडी पाटीलचा युवक संतोष बाळासाहेब ठोंबरे या युवकाचा जागीच मृत्यु झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, संतोष ठोंबरे हा नगर येथील आंनदॠषीजी हॉस्पिटलच्या प्रयोगशाळेत तंत्रज्ञ म्हणून काम करत होता. गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास दुचाकीवरून (एम. एच. १६, टी ८०८९) तो हॉस्पिटलकडे चालला होता. त्याचवेळी कार (एम. एच. ०४ जे. व्ही. १८३१) ही कार भरधाव जामखेडकडून नगरकडे चालली होती.
कार ओव्हरटेक करीत असताना संतोषच्या दुचाकीला जोराची धडक दिली आहे. अपघात एवढा भीषण होता की संतोषचा जागीच मृत्यू झाला. कार चालकाच्या बेफिकिरीने त्याचा मृत्यू झाला. नगर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस हेड काॅन्स्टेबल सचिन वनवे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.
नगर तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. दुपारी दीडच्या सुमारास चिचोंडी पाटील येथील अमरधाम येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|