दोन तरुणांकडून चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे जप्त

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 13 मार्च 2021:-  दोन तरुणांनी विक्रीसाठी आणलेली एक लाख रुपये किंमतीचे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे पोलीसांनी जप्त करत दोन तरूणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान जामखेड शहरात वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर पावले उचलत जामखेड पोलीसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

दरम्यान या दोन तरूणांना अटक करण्यात आली असून या मागे किती मोठे रॉकेट आहे का याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणामुळे मोठे रॅकेट उघड होणार असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी जामखेड शहरातील राहणारे ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव, वय 22 वर्षे राहणार जामखेड व दीपक अशोक चव्हाण, वय 32 वर्षे रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड यांना अटक करण्यात आली आहे.

शुक्रवारी (दि.१२) रात्री दहाच्या सुमारास जामखेड शहरात राहणारे ऋषी उर्फ पप्पू मोहन जाधव, (वय २२, रा. जामखेड), दीपक अशोक चव्हाण, (वय ३२, रा. तपनेश्वर गल्ली, जामखेड) हे दोन तरूण पिस्टल विक्री करत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाली.

त्यांनी सहका-यासह आरोपींच्या घरी छापा टाकून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे चार पिस्टल व सहा जिवंत काडतुसे आढळून आले. ऋषी उर्फ (पप्पू) मोहन जाधव हा विनापरवाना एक अग्निशस्त्र पिस्टल व २ जिवंत काडतुसे जवळ बाळगताना मिळून आला तर दुसरा आरोपी दीपक अशोक चव्हाण ३ पिस्टल व ४ जीवंत काडतुसे अशी विक्री करण्याच्या उद्देशाने स्वतःच्या कब्जात बाळगताना मिळून आला.

पोलीस आबासाहेब आत्माराम आवारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. अण्णासाहेब जाधव व पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली पोसई. राजेंद्र थोरात हे करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe