सभा पडली महागात; विखेंसह समर्थकांवर गुन्हे दाखल होणार

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- करोनाची वाढती संख्या लक्षात घेता सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. तसेच याचे पालन करण्यात यावे असे जिल्हा प्रशासनानें सक्तीचे आदेश देखील दिले आहे.

असे असतानाही विखेंच्या समर्थकांनी श्रीरामपूर शहरानजीक असलेल्या एका ठिकाणी सहविचार सभेचे आयोजन केले होते. आता या प्रकरणावरून हे समर्थक अडचणीत सापडले आहे.

यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक मनोज पाटील यांनी शहर पोलिसांना दिले आहे. जिल्ह्यात करोनाची संख्या वाढत आहे. शासनाने सार्वजनिक कार्यक्रम घेण्यास बंदी घातली आहे.

असे असताना आ. विखे समर्थकांनी सहविचार सभा घेेतली. या सभेला आ. विखे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. लग्न समारंभ झाल्यानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातात व या सहविचार सभेत 100 ते 200 लोक एकत्र जमले होते.

सभेची कोणतीही परवानगी घेतलेली नव्हती. मग त्यांच्याविरुध्द काय कारवाई करणार, असा प्रश्न पोलीस अधिक्षकांना विचारण्यात आला.

यावर पोलीस अधिक्षक पाटील यांनी तेथे उपस्थित असलेले पोलीस उपअधिक्षक संदिप मिटके व पोलीस निरीक्षक संजय सानप यांना या कार्यक्रमाबाबत चौकशी करून गुन्हा दाखल करण्याच्या सुचना दिल्या.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News