बोठेची खातिरदारी पाहता पोलिसांच्या भूमिकेबाबत संशय व्यक्त होऊ लागला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- सामाजिक कार्यकर्त्या रेखा जरे यांच्या हत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार बाळ बोठे याला हैदराबादेतून अटक करण्यात आली. त्याला शनिवारी संध्याकाळी एका आलिशान खाजगी वाहनातून पारनेर पोलिस ठाण्यात आणण्यात आले.

त्यानंतर त्याच्या अटकेची कारवाई करण्यात येऊन त्यास स्वतंत्र बराकमध्ये ठेवण्यात आले. त्याला रविवारी पारनेर न्यायालयापुढे हजर करण्यात येणार असल्याचे पोलीस सुत्रांकडून सांगण्यात आले.

दरम्यान, बोठे याच्यासह त्याच्या हैद्राबादी वकीलास पारनेरच्या पोलीस ठाण्यात व्हीआयपी ट्रिटमेंट देण्यात येत असल्याने पोलिसांच्या भुमिकेवर संशय निर्माण झाला आहे. व

कील जनार्दन अकुला यास न्यायालयात नेतांना व परत आणतांना बेड्या घालण्यात आल्या नव्हत्या. मात्र, महेश तनपुरे याला बेड्या घालण्याची तत्परता दाखविण्यात आली होती.

खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीची ही बडदास्त पाहून पोलीस ठाणे परिसरात उपस्थित सर्वच अचंबित झाले. बोठेला ठेवण्यासाठी एक बराक मोकळी करण्यात आली असून तिची स्वच्छता करून ठेवण्यात आली होती.

दरम्यान हत्याकांडातील आरोपी बाळ बोठे अनेक दिवसांपासून फरार होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत बोठे भोवती फास आवळला. शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास बोठे जरबंद झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe