कोरोनामुळे या तालुक्यातील आठवडे बाजार 31 मार्चपर्यंत बंद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-कोव्हिड सुचनांकडे कानाडोळा केल्याने राहाता तालुक्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहेत. गर्दीच्या ठिकाणांवर नियंत्रण आणण्याच्यादृष्टीने राहात्याचे तहसीलदार तथा घटना व्यवस्थापक कुंदन हिरे

यांनी राहाता व शिर्डी नगरपालिका कार्यक्षेत्र तसेच संपूर्ण ग्रामिण भागातील ग्रामपंचायत क्षेत्रात भरणारे आठवडे बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

तालुक्यातील काही गावांमध्ये भरणारे जनावरांचे बाजारही बंद ठेवण्यात येणार आहेत. याशिवाय रस्त्याच्या दुतर्फा बाजूस बसणारे तात्पुरते फेरीवाले, भाजीपाला व फळ विक्रेत्याबाबत स्थानिक प्राधिकरणाने योग्य ती दक्षता घेऊन त्यास प्रतिबंध करावा, असेही आदेशात म्हटले आहे.

हा बंदी आदेश येत्या 31 मार्च 2021 पर्यंत लागू राहणार आहे. राहाता तालुक्यात शनिवारी दिवसभरात 70 नवे रुग्ण बाधित निघाले असून आरोग्य विभाग सक्रीय झाला असला तरी राहाता पालीका व शिर्डी नगरपंचायत मात्र सक्रीय झालेली दिसून येत नाही.

करोना बाधित रुग्ण मुक्तपणे शहरात फिरत असून त्यांना अटकाव करण्याची जबाबदारी या संस्थांची असताना तसे होताना दिसत नसल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. करोना टेस्टमध्ये बाधित निघालेल्या रुग्णांची यादी आरोग्य विभागाने तातडीने पालीका अथवा ग्रामपंचायतींना देऊन सर्व यंत्रणा सक्रीय करावी, अशी मागणी होत आहे.

पॉझिटिव्ह रुग्णांचा हातावर शिक्के मारणार :- करोनाची लक्षणे असलेले व टेस्टमध्ये पॉझीटिव्ह आढळलेल्या रूग्णांना शिक्के मारणार आहे. तालुक्यात जे होम कॉरंटाईन रुग्ण असतात

ते बेजबाबदारपणे सार्वजनिक ठिकाणी फिरतात. यापुढे लक्षणे असलेले व पॉझीटिव्ह निघालेल्या रूग्णांच्या हातावर शिक्के मारण्यात येणार असून पालिका व ग्रामपंचायतींनाही याबाबत सूचना दिल्या जातील.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe