नागरिकांच्या बेशिस्तीमुळे कोरोनाचा मंदावलेला वेग वाढू लागला

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- श्रीरामपूर तालुक्यात करोनाबाधितांचा आकडा वाढला असून जिल्हा रुग्णालयात तपासणी केलेले रुग्णांची संख्या 28 झाली असून तर खासगी रुग्णालयात 18 रुग्ण आढळून आले असून

काल श्रीरामपूर तालुक्यात करोना बाधितांचा आकडा 46 वर जाऊन पोहोचला आहे. करोनातून मुक्त होऊन 31 जणांना घरी सोडण्यात आले आहे.

श्रीरामपुरात मागच्या वर्षासारखी परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून नियमांची कडक अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. मागील महिन्यात बैठकीनंतर श्रीरामपूर शहरात मास्क न वापरणार्‍या व नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर पोलिसांसह नगरपालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली होती

. त्याचा सकारात्मक परिणामही दिसू लागला होता.मात्र सध्या ही मोहीम थंडावल्याने नियमांची व मास्क वापरण्याबाबत उदासीनता वाढली आहे.

शाळा , विद्यार्त्यांसह शिक्षक देखील कोरोनाच्या विळख्यात :- श्रीरामपुरात करोना रुग्ण वाढीचा वेग वाढू लागला आहे. सध्या शाळा महाविद्यालये सुरू झाली आहेत. काही शाळा महाविद्यालयांत शिक्षक व विद्यार्थी करोना बाधित सापडत आहेत. श्रीरामपूर शहरातील काही शिक्षक बाधित झाले आहेत.

बेलापुरात एकूण सहा शिक्षक करोना बाधित सापडल्याने संस्थेने काही दिवसांसाठी संकुल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ऑनलाईन क्लास सुरू राहतील, असे शिक्षण संस्थेच्या सचिवांनी सांगितले आहे.

तर बाधित शिक्षकांच्या थेट संपर्कात आलेल्या इतर कोणत्याही शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांना थोडा जरी त्रास वाटला तर त्यांनी तात्काळ करोना चाचणी करून घ्यावी, इतरांनी काळजी घ्यावी, असे आवाहन गटशिक्षणाधिकारी संजीवन दिवे यांनी केले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe