तीन मुलांना भजी आणि थम्सअप मधे विष घालून, पित्याने संपविले जीवन !

Ahmednagarlive24
Published:

माढा :- स्वत:च्या दोन मुले आणि एका मुलीस भजी आणि थम्स अप मधून विष खायला घालून पित्याने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली. दोन मुलांचा दवाखान्यात उपचारादरम्यान मृत्यू झाला असून, मुलीची प्रकृती काही प्रमाणात सुधारत आहे. ही घटना बेंबळे (ता. माढा) येथे गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी घडली.

रवींद्र प्रभाकर लोखंडे (वय ३५, रा. वडापुरी, ता. इंदापूर, जि. पुणे) हा आपली मुलगी अनुष्का (वय ११), मुलगा अजिंक्य (वय ९), अविष (वय ६) यांना घेऊन बेंबळे येथे साडू (बायकोच्या बहिणीचा नवरा) हरी नारायण कांबळे यांच्याकडे गुरुवारी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास आला होता. 
परंतु हरी कांबळे व त्यांचे कुटुंबीय इतरत्र मजुरीसाठी गेले होते, म्हणून रवींद्र लोखंडे याने आपल्या तिन्ही मुलांसह उजनी डावा कालव्याच्या ५१ कि.मी. हद्दीत असलेल्या साईड पट्टीवर एका जंगली झाडाच्या सावलीत बसले. 

याठिकाणी त्याने अनुष्का, अजिंक्य व अविष या तिन्ही लेकरांना भजी खाऊ घातले व थम्स अप पाजले. भजी व थम्स अप हे रवींद्र याने येताना बरोबरच आणले होते. यामध्ये विष घालून त्याने मुलांना खाऊ घातले व पाजले आणि नंतर स्वत: तेथील जंगली झाडास गळफास घेतला.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Leave a Comment