अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:- राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथील साई ध्यान मंदिराजवळ बाळासाहेब विश्वनाथ जाधव यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीचे बकरू ठार केल्याची घटना घडली आहे. यामुळे या परिसरात बिबट्याची भीती पसरली असून वनविभागाने पिंजरा लाऊन बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
काल शनिवारी पहाटे ३ वाजेच्या सुमारास बाळासाहेब जाधव यांच्या वस्तीवर बिबट्या आला. गोठ्यात २ शेळ्या व २ बकरू बांधलेले होते.
तसेच गायी व जनावरे गोठ्याच्या दुसऱ्या बाजुला बांधलेली होती. बिबटयाने गोठ्यात प्रवेश करत शेळीच्या बकराला ठार केले. जनावरांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बाळासाहेब यांचे लहान बंधू मच्छद्रिं जाधव जागे झाले.
त्यांनी घराबाहेर येऊन पाहिले असता, बिबट्या बकराला फरफटत ओढून नेत शेजारच्या ऊसात घेऊन जाताना त्यांना दिसला. कोल्हार खुर्द परिसरात बिबट्याचा संचार वाढला असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने याची तात्काळ दखल घेऊन पिंजरा लावावा, अशी मागणी करण्यात येत आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|