अहमदनगर ब्रेकिंग : ऊसतोड करताना सापडला बेपत्ता इसमाचा मृतदेह !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 14 मार्च 2021:-शेतामध्ये ऊसतोड सुरु असताना ऊसतोड कामगारांना सरीत गावातील तिन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आले.

ही घटना श्रीरामपूर तालुक्यातील निपाणीवडगाव येथील परसराम आसाराम गायधने यांच्या शेतात घडली. गायधने यांनी पोलिस पाटील यांना घटनेची माहिती दिली.

त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यास माहिती कळवली. पोलिस निरीक्षक संजय सानप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक संजय दुधाडे तसेच पोलीस नाईक दत्तात्रेय दिघे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

परिसरातील नागरिकांच्या मदतीने सदर व्यक्तीबाबत अधिक चौकशी केली असता. गावातील गोरक्षनाथ गंगाधर मोरे (वय ६५) हे दोन ते तीन महिन्यापासून बेपत्ता असल्याची माहिती मिळाली.

त्यावरून पोलीस नाईक संंजय दुधाडे यांनी नातेवाईकांना मृतदेह दाखविताच सदर मृतदेह हा आमच्या वडिलांचा असल्याबाबत एकनाथ मोरे यांनी माहिती दिली. ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी श्रीरामपूर येथे पाठवला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe