अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- चिक्कूची 12 वर्षे वयाची फळबाग! या बागेत पेरू लागवडीचा यशस्वी प्रयोग करून अर्थप्राप्ती करण्याचा प्रयोग गणेश कारखान्याचे माजी संचालक भगवानराव राजाराम टिळेकर या शेतकर्याने आपल्या शेतात केला आहे.
हा प्रयोग यशस्वी झाला आहे. टिळेकर यांची अस्तगाव, राहाता व एकरुखे शिवारात शेती आहे. 11 ते 12 एकर शेती त्यांना आहे. त्यांनी एक हेक्टर क्षेत्रात 12 वर्षांपुर्वी चिकूची 93 झाडे लावले आहेत.
तसेच त्यांनी या मोकळ्या जागेत पेरुची चार वर्षापूर्वी लागवड केली. पेरू व चिकूचे या दोन्ही फळांचे एकत्रित उत्पादन घेतले. चिकूचे योग्य अंतर असल्याने दोन ओळीत दुसरे फळपिकांची लागवड करता येते.
वर्षातून तीन पिके घेण्याची किमया त्यांनी आपल्या प्रयोगातून साधली आहे. सध्या चिकू झाडांना लगडले आहेत. पेरुचे वर्षातून दोन बहार ते धरतात. वर्षभरात सर्व क्षेत्रावरील बागेतून त्यांना 10 ते 11 लाखांचे उत्पादन मिळते.
शेतकर्यांनी फळबागांकडे वळले तर निश्चित फायदा आहे. शासनाने याबाबत निश्चित धोरण घेतले आहे. कृषीविभागामार्फत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना, भाऊसाहेब फूंडकर फळबाग योजना या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांनी फळबाग लागवड करावी व लाभ घ्यावा.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|