आमदार शंकरराव गडाखांसमोर ‘हे’ नवे आव्हान

Published on -

नेवासे :-  माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी २०१४ ते २०१९ या काळात नेवासे मतदारसंघासाठी राज्य शासनाच्या विविध विभागांमार्फत बाराशे कोटींचा निधी आणून प्रत्येक गावातील पायाभूत सुविधांचा विचार करून रस्ते, पाणी, वीज, सभामंडपासाठी पैसे दिले. 

यापेक्षाही मोठे काम करण्याचे आव्हान आमदार शंकरराव गडाख यांच्यासमोर आहे. नेवासे हे मोठे धार्मिक अधिष्ठान मानले जाते. श्रीक्षेत्र नेवासे, देवगड, शनिशिंगणापूर येथे मोठ्या प्रमाणात विकासकामे चालू आहेत. 

याशिवाय तालुक्यात जलयुक्त शिवार, रस्ते, सभामंडप यासह वैयक्तिक लाभाच्या योजना राबवण्यात आल्या. राज्य शासनाच्या निधीतून देवगडचा कायापालट चालू आहे. 
नेवाशातील संत ज्ञानेश्वर महाराज मंदिरातील काही विकास कामे झाली असून काही अपूर्ण आहेत. ज्या विकासासाठी तालुक्यात सत्तापरिवर्तन झाले, तो विकास आता सर्वांना अपेक्षित आहे. 

मुरकुटे यांनी सादर केलेले कोट्यवधींचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनदरबारी दाखल आहेत. त्यासाठी पाठपुरावा करून नेवाशाचा विकासरथ वेगाने पुढे नेण्याचे मोठे आव्हान नवनिर्वाचित आमदार गडाख यांच्यासमोर आहे.

महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News