पैसे नाही म्हणून शाळा सोडावी लागली, बांधकामावर लेबर म्हणून काम केले …, ‘अशी’ आहे आशिया खंडातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तीची जीवन कथा

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:-  चीनच्या सर्वात श्रीमंत व्यावसायिकाबद्दल बोलले जाते तेव्हा अलिबाबाचे संस्थापक जॅक मा यांचे नाव मनात येते. परंतु वास्तव या पलीकडे आहे. जोंग शानशान सध्या चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहे. त्याना चीनचा वॉटर किंग म्हणतात. एकेकाळी शानशान हा आशियातील सर्वात श्रीमंत माणूस झाला होता.

जोंगने भारतीय उद्योगपती मुकेश अंबानी यांना मागे टाकले. ब्लूमबर्ग निर्देशांकात जगातील सर्वात श्रीमंत उद्योजक म्हणून 68.5 बिलियन डॉलर्सच्या संपत्तीसह जोंग शानशान 11 व्या स्थानावर आहेत. तर भारताचा सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी 12 व्या स्थानावर घसरले.

शानशानने थोड्या काळासाठी हे पद सांभाळले. तथापि, शानशानचा सर्वात श्रीमंत व्यक्ती म्हणून उल्लेख केल्यामुळे, लोक कदाचित ते आयटी उद्योगातील असल्याचे समजू शकतील, परंतु ते त्यांच्या बाटलीबंद पाणी आणि फार्मसी कंपन्यांमुळे येथपर्यंत पोहोचले आहे. त्यांना कसलाही राजकीय किंवा इतर वारसा नाही , ते आपल्या कौशल्याने येथपर्यंत पोहोचले आहेत.

शानशान चीनच्या सर्वात मोठ्या बाटलीबंद पाणी कंपनी नोंगफू स्प्रिंगचे संस्थापक आहेत. ते औषध कंपनी Wantaiचे मालकही आहेत. इतर यशस्वी लोकांप्रमाणेच सुरुवातीच्या काळात शानशानला बर्‍याच समस्यांचा सामना करावा लागला. 1954 मध्ये चीनच्या हंगझोऊ येथे जन्मलेल्या शानशान पैशाअभावी शाळा मध्यभागी सोडावी लागली होती.

1966-76 मध्ये चीनमध्ये सांस्कृतिक चळवळ चालू होती. कुटुंबाचे पोषण करण्यासाठी त्यांना कन्ट्रक्शन साईटवर लेबर म्हणून देखील काम करावे लागले. शेती करण्यासाठी, बांधकाम साइटवर त्यांना श्रमदान देखील करावे लागले. 1977 मध्ये त्यांनी महाविद्यालयात प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा दिली, परंतु ते प्रथम नापास झाले.

त्यानंतर त्यांनी Zhejiang च्या रेडिओ आणि टीव्ही विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. 1984 मध्ये त्यांनी झेजियांग डेलीचे रिपोर्टर म्हणून काम केले. यावेळी 500 हून अधिक सेल्फ मेड व्यावसायिकांच्या मुलाखती घेतल्या. त्यातूनच व्यवसाय सुरू करण्याची संकल्पना त्याच्या मनात निर्माण झाली.

1988 मध्ये त्यांनी मशरूमपासून तर कासव विक्रीपर्यंत काम केले. त्यानंतर Wahaha ड्रिंक्स कंपनीत ते दाखल झाले. तेथे त्यांना बिझनेस आयडिया मिळाली. त्यातून नोंगफू स्प्रिंग ची सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पहिले नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News

Stay updated!