अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- नगर उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी प्राप्त अधिकार शक्तीचा वापर करीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या उद्देशाने पाच जणांना एक वर्षाच्या अवधीसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे.
यात नगर शहरातील एक, भिंगारमधील दोन आणि नेवासे, खळवाडी येथील एकाचा समावेश आहे. नगर उपविभागीय दंडाधिकारी यांच्याकडे पोलीस विभागाकडून या पाचजणांविरुध्द कारवाई संबंधी प्रस्ताव दाखल झाले होते.
पोलीस ठाण्यांकडून दाखल करण्यात आलेल्या प्रस्तावात संबंधितांवर भिंगार कॅम्प, कोतवाली, तोफखाना, एमआयडीसी आणि नेवासे पोलीसात दाखल असलेल्या गुन्ह्यांची यादी नमूद करण्यात आली.
तसेच संबंधीतांकडून कायदा ,सुव्यवस्थेस बाधा निर्माण होण्याची शक्यता वर्तवीण्यात आली. पोलीस ठाण्याकडून प्राप्त प्रस्तावावर विचारविनिमय करीत उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी या चारही जणांना आदेश जारी झाल्याच्या तारखेपासून आगामी एक वर्षांच्या अवधीसाठी जिल्हा हद्दीतून हद्दपार केले आहे.
रोहित भिम सिसवाल उर्फ रेपू (माधवबाग, भिंगार), पवन येशू भिंगारदिवे (घासगल्ली, भिंगार), सोनू उर्फ स्वप्नील दातरंगे (दातरंगे मळा, नालेगाव),आणि सचिन उर्फ गटण्या राजेंद्र पवार (खळवाडी, नेवासा) अशी त्यांची नावे आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|