अहमदनगर Live24 टीम, 15 मार्च 2021:- यशस्वी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे हत्याकांडातील मुख्य सूत्रधार असणाऱ्या बाळ बोठे याच्या शनिवारी हैदराबाद येथून पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर आज ( रविवारी ) त्याला पारनेरच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
त्यानंतर त्याची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली. दरम्यान बोठेने रविवारची रात्र एमआयडीसीच्या पोलीस कोठडीत काढली. दरम्यान कोठडीतील बोठेला डीवायएसपी अजित पाटील, एएसपी सौरभ आगरवाल यांनी इन्ट्रोगेट केले.
मात्र, त्याने तोंड उघडले नाही. त्याचा जप्त केलेला आयफोन आज उघडण्याची शक्यता आहे. त्यातून काय भानगडी बाहेर निघणार याकडे नगरकरांचे लक्ष लागून आहे.
30 नोव्हेंबरला यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची जातेगाव घाटात गळा चिरून हत्या झाली. त्याचा मुख्य सूत्रधार पत्रकार बाळ बोठे असल्याचे समोर येताच तो पसार झाला होता.
तीन महिने पोलिसांना गंगुरा देऊन दडलेल्या बोठेला शनिवारी हैदराबादमधून अटक केली. बोठेला पोलीस कोठडी मिळाल्यानंतर त्याला नगरच्या एमआयडीसी पोलीस ठाण्यातील लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आहे.
काल, रविवारपासून पोलिस बोठेची कसून चौकशी करीत आहेत. तर, बोठे याचा पोलिसांनी जप्त केलेला आयफोन आज उघडला जाणार आहे. त्यासाठी बोठे याला पोलिस अधीक्षक कार्यालयात आणले जाण्याची शक्यता आहे.
आता बोठे याच्या आयफोन मधून काय रहस्य निघणार ? याची उत्सुकता आहे. दरम्यान, बोठे हा पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याची सुत्रांची माहिती आहे.
पोलिसांनी बोठे याच्या घराची झडती घेतली असता, त्यांना आयफोन सापडला होता. हा आयफोन लॉक असल्यामुळे तो उघडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते.
या फोनला छेडछाड झाल्यास त्यामधील डाटा करप्ट होण्याचा धोका होता. त्यामुळे पोलिसांनी बंगलौर येथील कंपनीला तसेच मुंबईच्या सायबर पोलिसांना संपर्क केला होता.
बंगलौर येथील कंपनीने आयफोन उघडण्यास सहा महिन्यांचा अवधी लागणार असल्याचे सांगतिले होते. दरम्यान बोठे याची विविध क्षेत्रातील नेटवर्क पाहता, आता या आयफोन मधून नेमकी कोणती माहिती समोर येतेयं, या कडे अनेकांचे लक्षआहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|