अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- जिल्ह्यात आज एकूण ४७५ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत, त्यात सहाजण बाह्य जिल्ह्यातील आहेत.
तर संगमनेर तालुक्यातील ४३ जणांना संक्रमण झाल्याचे समोर आले असून त्यात शहरातील पंधरा जणांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्याच्या रुग्णसंख्येत आजही भर पडून तालुका आता ७ हजार ४६७ रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.
संगमनेर तालुक्यात आढळलेल्या एकूण ४३ जणांमध्ये शहरातील पंधरा जणांचा समावेश आहे. तर ग्रामीण भागात २८ जणांचा समावेश आहे. तालुक्यात सध्या ३३७ रुग्ण उपचार घेत आहेत.
तर ११ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. जिल्ह्यासह संगमनेर तालुक्यात कोविड संक्रमणातून दररोज मोठ्या प्रमाणात रुग्ण समोर येत आहे.
संगमनेर तालुक्यात अद्यापही कोविडचे नियम पाळण्यात नागरिक चालढकल करीत असल्याने रोज नवनवीन भागातून रुग्ण समोर येत असल्याचेही समोर आले आहे.
या संक्रमणात आता आत्तापर्यंत सुरक्षित असलेला व्यापारी वर्गही झपाट्यात येत असल्याने नियमांचे सक्तिने पालन करण्याची गरज आहे अन्यथा कोविडचे पुन्हा सुरु झालेले संक्रमण जिल्ह्याला लॉकडाऊनच्या दिशेने नेणारे ठरेल
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|