जरे हत्याकांड ! बोठेच्या या सहकारी आरोपीला जामीन मंजूर

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  रेखा जरे यांच्या हत्याकांडातील प्रमुख आरोपी बाळ बोठे याला फरार होण्यास मदत करणाऱ्या महेश तनपुरे याचा जामीन पारनेर न्यायालयाने मंगळवारी सांयकाळी मंजूर केला, दरम्यान, बोठे याला हैदराबाद येथे मदत करणारे हैदराबादमधील वकिल जनार्दन अकुला चंद्रप्पा, राजशेखर अंजय चाकाली, शेख इस्माईल शेख अली, अब्दुल रहमान अब्दुल आरीफ यांच्या कोठडीची मुदत संपल्याने त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते.

न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जरे हत्याकांडातील बोठे याला पोलिसांनी चार दिवसांपूर्वी हैदराबाद येथून सिनेस्टाईल अटक केली.

त्याला फरार होण्यास मदत करणारे हैदराबाद येथील चौघे व नगर मधील एक जण यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली.

मात्र पोलिस कोठडीची मुदत संपताच संबंधित आरोपींनी जामिनासाठी अर्ज केला. यावर मंगळवारी सुनावणी झाली. त्यात महेश तनपुरे यास जामीन देण्यात आला.

या प्रकरणात तपासाकामी गरज लागेल तेव्हा चौकशीसाठी हजर होईल लागेल, या अटीवर तनपुरे याला जामीन मंजूर केला. दरम्यान, तनपुरे याच्या घराची पोलिसांनी मंगळवारी झडती घेतली.

घर झडतीमध्ये काही महत्वाच्या वस्तू हाती लागल्याची माहिती सूत्रांनी दिली. अटक करण्यात आलेल्या बोठेला एमआयडीसीतील पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.

त्याच्या भोवती एक पोलीस उपनिरीक्षक व पाच कर्मचार्‍यांचा बंदोबस्त आहे. त्याला तीन दिवसांपासून नगर ग्रामीण उपविभागीय कार्यालयात चौकशीसाठी आणले जात आहे. मंगळवारी दुपारी त्याला चौकशीसाठी आणले होते.

पोलीस त्याच्याकडे कसून चौकशी करत आहे. रात्री उशिरा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी स्वत: बोठे याची चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
  • #Former Union Minister Dilip Gandhi dies
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe