कृषी विभागाच्या शेतातील 17 एकर क्षेत्रावरील गवत जळून खाक

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- कृषी विभागाच्या शेतातील सुमारे 17 एकर क्षेत्रावरील गवत जळून खाक झाल्याची घटना जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात घडली आहे. दरम्यान या आगीमुळे कृषी विभागाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असल्याची माहिती समजती आहे.

सविस्तर माहिती अशी कि, पाथर्डी शहरालगत कृषी विभागाची मोठी जमीन वापराविना पडून असून तेथे मोठ्या प्रमाणावर गवत आहे. येथून वीज वाहक तारा हंडाळवाडीकडे जातात.

जोरदार वार्‍यामुळे स्पार्किंग होऊन आग लागली, असे समजून कृषी पर्यवेक्षक आर.टी. शिदोरे, कृषी सहाय्यक किरण सावंत, मजूर महादेव भापकर, रोपमळा मदतनीस सचिन मुने यांनी उपलब्ध पाण्याच्या सहाय्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला.

पालिका अग्निशामक दलाला फोन केला. अग्निशामक दलाच्या कर्मचार्‍यांनी तात्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आग तासाभरात आटोक्यात आणली.

वार्‍याचा जोरदार वेग असल्याने अल्पावधीत आग पसरली. वाळलेल्या गवताने चटकन पेट घेतला. वेळीच दखल घेतल्याने मोठा अनर्थ टळला. कृषी खात्याच्या रेकॉर्ड रूमपर्यंत आग पसरत गेली होती.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
  • #Former Union Minister Dilip Gandhi dies
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe