पाणी प्रश्नावरून संतप्त आंदोलनकर्ते आयुक्तांच्या दालनात जाऊन झोपले

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:-  महापालिका नागरी सेवा देण्यास असमर्थ ठरत आहे. मुकुंदनगरमधील पिण्याच्या पाणीचा प्रश्‍न गंभीर बनल्याने या भागातील नागरिक आणि आंदोलकांनी आयुक्तांच्या दालनात झोपा काढू आंदोलन केले.

प्रलंबीत कामे मार्गी लावण्याची मागणी नगसेवक आसिफ सुलतान यांनी मनपा आयुक्त शंकर गोरे यांना निवेदनाद्वारे केली होती. मात्र प्रश्न मार्गी न लागल्याने आंदोलन करण्यात आले.

मुकुंदनगरमधील प्रभाग ३ मध्ये दोन ते चार दिवासाआड पाण्याचे वितरण होत असून, याला वितरण व्यवस्थेवरील दोष कारणीभूत आहे. लोकप्रतिनिधींना नागरिकांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.

आगामी महिन्यात पवित्र रमजानचे उपास सुरू होणार असून या भागात वेळेवर नियमीत पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. या भागातील अनेक ठिकाणी पाण्याचा पुरवठा व्यवस्थित होत नाही.

फेज टू पाण्याची पाईप लाईनचे काम ९५ टक्के पूर्ण झाले आहे. पाण्याची उंच टाकी बांधून आठ वर्ष झाली आहे. फेज टू चे राहिलेले काम लवकरात लवकर पूर्ण करून नागरिकांना नवीन पाईपलाईन मधून नळ कनेक्शन देण्यात यावे.

पाण्याची टाकी स्वच्छ करून निर्जंतुकीकरण करून त्यातून पाण्याचे वाटप करण्यात यावे. तसेच वितरण व्यवस्थेचे दोष दूर करण्यासाठी कामगारांची संख्या वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.

तसेच मुकुंद नगर मधील नागरी समस्या न सुटल्यास बजेटची सर्वसाधारण ची सभा होणार आहे. त्यामध्ये नगरसेवक आसिफ सुलतान यांनी आत्मदहन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe