अहमदनगर Live24 टीम, 17 मार्च 2021:- राजूर येथील लक्ष्मीनारायण मंदिरामागे टाकलेल्या छाप्प्यात तब्बल १६२ घरगुती वापराच्या अवैध गॅस टाक्यांचा साठा जप्त करण्यात आल्या आहेत.
या टाक्यांची अंदाजे रक्कम ३ लाख १७ हजार ४५० रुपये आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, गुप्त बातमीद्वारामार्फत राजूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे यांना समजले कि,
राजूर गावात लक्ष्मीनारायण मंदिरामागे अवैध गॅस सिलेंडरचा गैरवापर सुरु आहे. त्यावरून साबळे यांनी पथकासह तेथे राहत असलेल्या गणेश उर्फ राजेंद्र लहामगे याच्या घरावर छापा टाकला.
त्याठिकाणी घराच्या खोलीत व गोठ्यात १६२ घरगुती वापराचे सिलेंडर जप्त करण्यात आले. तसेच गॅससिलेंडरमधून वाहनात गॅस भरण्यासाठी लागणारी मशीन व सामग्री त्याठिकाणी मिळून आली.
याप्रकरणी पोलीस स्टेशनला पोलीस नाईक व्ही. के. मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लहामगे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|