पुणतांब्यात दुकाने 8 ते 5 या वेळेत सुरु राहणार

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-  करोनाचा संसर्ग वाढल्याने पुणतांबा येथील करोना समितीचे अध्यक्ष डॉ. धनजंय धनवटे यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची बैठक संपन्न झाली. त्यात पुणतांबा येथील व्यावसायिक दुकाने सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत सुरु ठेवण्याच्या निर्णय झाला.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता त्याला अटकाव करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. त्याचबरोबर करोनाच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करण्याचे व नियमाचे उल्लंघन करणारावर दंडात्मक कारवाई करण्याचे ठरविण्यात आले.

दरम्यान नुकतेच राहात्याच्या पोलीस अधिकार्‍यांनी पुणतांबा येथे येऊन मास्क न घालता फिरणार्‍यांवर दंडात्मक कारवाई केली. त्याचबरोबर येथील ग्रामीण रुग्णालयातही वैद्यकीय अधिकारी व त्यांचा स्टाफ करोनाचा संसर्ग वाढू नये

म्हणून सक्रिय झाले आहेत. गावात व परिसरात वाढत चाललेल्या करोनाच्या संसर्गावर नियत्रंण करण्यासाठी पुणतांबा येथील ग्रामपंचायत प्रशासन व करोना समिती सतर्क झाली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe