पत्नीस जिवे मारण्याचा प्रयत्न; पतीला दहा वर्षे सक्तमजुरी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- पत्नीच्या अंगावर ऑसिड टाकून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पतीस दहा वर्ष सक्तमजुरी व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली आहे.

फिर्यादी पिडितेस जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश अशोककुमार भिलारे यांनी आरोपी श्रीकांत आनंद मोरे (रा.प्रबुद्धनगर, आलमगीर, भिंगार, अहमदनगर) यास दोषी धरले.

आरोपी मोरे याला १० सक्तमजुरी व ५० हजार दंड व दंड न भरल्यास ६ महिने साधी कैद अशी शिक्षा ठोठावली. दंडाच्या रक्कमेपैकी ४० हजार रुपये पिडीतेस देण्याचा आदेश दिला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe