अहमदनगर ब्रेकिंग : शिक्षिकेवर बलात्कार करणाऱ्या क्लार्कला अटक !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- एका शिक्षिकेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची घटना अहमदनगर जिल्ह्यात घडली आहे.

या प्रकरणी पिडित शिक्षिकेच्या फिर्यादीवरून न्यायालयामध्ये काम करत असलेल्या क्लार्कवर गुन्हा दाखल करत त्यास अटक केलीय.

तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपी रवींद्र राजेंद्र सोनवणे (वय ३१ रा. तपोवन रोड, नगर) याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुरज मेढे यांच्या पथकाने रात्रीच आरोपी सोनवणे याला अटक केली आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe