कोपरगावात ११७ कोरोनाचे रुग्ण आढळले !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-  बुधवारी (१७) खासगी रुग्णालयातील ७४ व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर नगर येथे पाठविलेल्या ८५ तपासण्यांपैकी ३६ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

रॅपिड टेस्टमधील १२ जणांपैकी ७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. असे एकूण ११७ रुग्ण पॉझिटिव्ह आलेले आहेत, अशी माहिती ग्रामीण रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली.

याबाबत डॉ. फुलसौंदर यांनी सांगितले, की बुधवारपर्यंत रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.५० टक्के तर कोरोनाग्रस्तांचे प्रमाण केवळ १५.७७ टक्के कोरोनामुळे मृत्यू झालेले यांचे प्रमाण केवळ १.३९ टक्के इतके आहे.

बुधवारी कोपरगाव येथील कोविड सेंटरमध्ये ३६ रुग्णावर उपचार सुरु आहेत. डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी सांगितले. आजपर्यंतचे कोपरगाव कोरोना अपडेट : २२२७८ स्वॅब तपासणी यात ६३७८ नगर,

रॅपिड टेस्ट १५९००, निगेटिव्ह तर ३५१३ पॉझिटिव्ह, ३१४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहे. दुर्दैवाने ४९ जणांचा मृत्यू, ३६ रुग्णावर उपचार सुरू आहेत. बुधवारी (१७) रोजी सापडलेल्या ११७ पॉझिटिव्ह रुग्णांबरोबर संपर्क साधण्यात आला असून

त्यांना उद्या कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात येईल, एसएसजीएम कॉलेज मध्ये १६० बेड, मूकबधिर विद्यालय ५० तर ग्रामीण रुग्णालयामध्ये ३२ असेही एकूण २४२ बेड आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe