अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- अकोले तालुक्यातील चैतन्यपूर ते भक्ताची वाडी हा रस्ता वाहतुकीस खुला करण्यासाठी विद्यमान सरपंचासह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.
आज चौथ्या दिवसअखेरही उपोषण सुरूच असून, सरपंचाची प्रकृती खालावली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तालुक्यातील चैतन्यपूर ते भक्ताची वाडी हा रस्ता हा रस्ता गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून वाहतुकीस खुला होता.
परंतु गेल्या सहा महिन्यांपासून एका ग्रामस्थाने रस्ता अडविला आहे. यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी तहसीलदारांना निवेदने देऊन रस्ता खुला करण्याची मागणी केली होती.
मात्र तहसीलदारांनी त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा भ्रमनिरास झाल्यामुळे आमरण उपोषणाचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार हा रस्ता वाहतुकीस खुला करावा,
ग्रामस्थांवर दाखल खोटे गुन्हे मागे घ्यावेत व रस्त्याचे रखडलेले काम त्वरीत सुरू करावे या मागण्यांसाठी सरपंच नितीन डुंबरे यांच्यासह सहा ग्रामस्थ सोमवारपासून (15 मार्च) आमरण उपोषणास बसले आहेत.
आज चौथ्या दिवसअखेर त्यांची प्रकृती खालावली असून काही बरे-वाईट झाले तर त्याची जबाबदारी प्रशासनाची राहील असा इशारा नीलेश गवांदे व ग्रामस्थांनी दिला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|