महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत मेघगर्जनाची शक्यता !

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- उन्हाळ्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले असतानाच गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांतील वातावरणात बदल झाल्याचं पहायला मिळत आहे.

भारतीय हवामानशास्त्र विभागाने आपल्या ताज्या अद्ययावत माहितीत म्हटले की, पश्चिम विक्षोभ पुन्हा एकदा देशात सक्रिय आहे, ज्यामुळे बर्‍याच राज्यात वादळाची शक्‍यता आहे.

ज्यामुळे पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांत ऑरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला आहे.

तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना, गारा आणि वादळी वाऱ्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवला आहे.

हवामान विभागाने ज्या जिल्ह्यांत उद्या (१९ मार्च २०२१) ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे त्यामध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे.

तर यल्लो अलर्ट असलेल्या जिल्ह्यांत गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम या जिल्ह्यांचा समावेश आहे.

मध्य महाराष्ट्र :- तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडटकाटासह पावसाची शक्यता

मराठवाडा :- काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता, तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडटकाटासह गारा पडण्याची शक्यता

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News