अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-नारायण राणे काही झाले की मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागतात. ती त्यांची नित्याची सवय झालेली आहे. त्यांना मुख्यमंत्री बनण्याची घाई झालेली आहे, अशी टीका मंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
सचिन वाझे प्रकरणाबाबत अशोक चव्हाण म्हणाले, या प्रकरणामध्ये उद्धव ठाकरे यांची भूमिका स्पष्ट आहे. ते कुणालाही पाठीशी घालणार नाहीत. तिन्ही पक्षांचीही तशीच मागणी आहे.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2021/03/ashok-chavan-3.jpg)
तसेच सरकारमध्ये अस्वस्थता नाही आहे. तसं पाहायला गेले तर सचिन वाझे खूप लहान माणूस आहे. या प्रकरणानी निष्पक्षपातीपणे चौकशी व्हायला हवी.
तसेच जे दोषी आढळतील त्यांच्यावर कारवाई केली जाईल. मात्र या प्रकरणात सध्या भाजपा ट्रायल सुरू आहे, असा टोलाही अशोक चव्हाण यांनी लगावला आहे.
पोलीस महासंचालकांना पोलीस आयुक्त पदावर आणण्यात आले आहे. परमबीर सिंग यांना मोहरा बनवल्याचे आरोप विरोधक करत आहेत.
यावर गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, वाझे प्रकरणात पोलीस आयुक्त यांची बदली ही प्रशासकीय बदली नाही. ती कारवाई आहे. चौकशीत काही गोष्टी पुढे आल्या.
अक्षम्य अशा त्या गोष्टी आहेत. त्या समजल्याने या प्रकरणाची चौकशी व्यवस्थित झाली पाहिजे. चौकशीमध्ये बाधा येऊ नये, असे गृहमंत्री देशमुख यांनी स्पष्ट केले.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|