अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:-संपूर्ण महाराष्ट्रातून वीज कापण्यावरून राज्य सरकारवर मोठ्या प्रमाणात टीका झाली. हे सर्व प्रकरण हाताळू न शकल्याने ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचे पद धोक्यात आले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे ऊर्जामंत्रिपद जाऊ शकतं अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. लॉकडाउन काळामध्ये १०० युनिट वीज माफी देण्याच्या घोषणेवर ऊर्जामंत्री ठाम असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं होतं.
![](https://ahmednagarlive24.com/wp-content/uploads/2019/09/2000px-Flag_of_the_Indian_National_Congress.svg_-2.png)
पण आता आपल्या वक्तव्यावरुन मागे फिरत आपण असं कधी सांगितलंच नव्हतं, १०० युनिट विज बिल माफीसाठी एक समिती बनवली असं सांगितलं असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.
यावरून विरोधी पक्षाने नितीन राऊत यांच्यावर टीका करण्याची एकही संधी सोडली नाही. महाराष्ट्रात माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली अनेक ठिकाणी महावितरणच्या ऑफिसवर मोर्चे काढण्यात आले.
तसेच बऱ्याच ठिकाणी कार्यालयाला कुलूप लावण्यात आलं. राज्यामध्ये थकबाकीदार ग्राहकांची वीज कापण्याचे आदेश नुकतेच ऊर्जामंत्र्यांनी दिले.
तसेच महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द करून त्यांना थकबाकीदार ग्राहकांची विज कापण्यासाठी पुन्हा कामावर रुजू होण्याचे आदेश देण्यात आले होते.
ऊर्जामंत्री नितीन राऊत आणि नाना पटोले फेब्रुवारी महिन्यामध्ये सोनिया गांधी यांच्या भेटीला गेले असताना या भेटीवरून राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होतं. राज्यातील बिलाच्या मुद्द्यावरून सध्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत हे चांगलेच अडचणीत आले आहेत.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|