राहुरी :- कर्जाचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने आलेल्या नैराश्यातून गडदे आखाडा येथील अविवाहित तरूणाने गळफास लावून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री राहुरीच्या गडदे आखाडा येथे ही घटना घडली.
भारत बारकू गडदे (२४) याने दोन वर्षांपूर्वी फायनन्स कंपनीकडून कर्ज घेऊन ट्रॅक्टर खरेदी केला होता. भारतने दोन सहामाही हप्ते व्याजासह भरले होते. मात्र, नंतर हप्ते न भरल्याने फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेला.

ट्रॅक्टर माघारी आणण्यासाठी भारतने उसनवार करून पैसे जमवले. मात्र, या ट्रॅक्टरचा लिलाव झाल्याने भारतचे प्रयत्न निष्फळ ठरले. नैराश्य आलेल्या भारतने घरातील आढ्याला गळफास घेत या जगाचा निरोप घेतला.
भारतचा मृतदेह पाहून आई-वडिलांनी हंबरडा फोडला. कर्जाचा हप्ता थकल्याने ट्रॅक्टरचा झाला लिलाव काम न मिळाल्याने अडचणींत पडली भर भारत गडदे हा अल्पभूधारक शेतकरी होता. जोडधंद्यासाठी फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन त्याने ट्रॅक्टर घेतला होता.
मात्र, गळीत हंगामात ऊसतोडणी कामासाठी जुगाड मिळाले नसल्याने आर्थिक अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच फायनान्स कंपनीने ट्रॅक्टर ओढून नेत लिलाव केल्याने हा आघात भारतला सहन झाला नाही.
- Stock Split: अदानी ग्रुपची ‘ही’ कंपनी गुंतवणूकदारांना दिवाळीपूर्वी देणार गिफ्ट! 5 वर्षात दिलेत 1505% रिटर्न…बघा अपडेट
- Share Market: ‘या’ शेअर्सने गुंतवणूकदारांच्या पैशांची केली माती! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये तर नाहीत ना? बघा यादी
- Smallcap Stocks: लॉन्ग टर्म गुंतवणुकीची मोठी संधी! ‘हे’ स्मॉल कॅप्स शेअर्स देतील 40% पर्यंत रिटर्न? बघा लिस्ट
- Mutual Fund: टाटाच्या ‘या’ म्युच्युअल फंड योजनेने बनवले करोडपती! 10 हजारांच्या एसआयपीने दिले 5.17 कोटी रिटर्न
- Gold Matket: तुम्हाला देखील 18 कॅरेट सोने खरेदी करायचे आहे? तर आधी हे वाचा