जनता कर्फ्यूला नागरिकांचा सकारात्मक प्रतिसाद

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:- राहाता शहरात करोनाचे वाढते रूग्ण लक्षात घेता गुरूवारचा आठवडे बाजार बंद करण्यात आला. त्याचबरोबर गुरूवारी राहाता व साकुरी येथील सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवून एक दिवसाचा जनता कर्फ्यू पुकारला होता.

या जनता कर्फ्युला राहाता, साकुरीत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला असून आठवडे बाजारसह सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले. प्रशासकीय अधिकार्‍यांच्या आवाहनाला राहाता व साकुरी येथील व्यापारी व नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला.

दिवसभरात कोणीही दुकाने उघडली नाहीत. या जनता कर्फ्यू दरम्यान तालुक्यांमध्ये सकाळी अकरानंतर रस्ते निर्मनुष्य दिसत होते. विनाकारण विनामास्क फिरणार्‍यांवर पोलिसांनीही कारवाईचा बडगा उगारलेला दिसून येत होते.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe