अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-नेवासा तालुक्यातील कुकाणा येथे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाला शेवगा येथील एका महिलेने शिवीगाळ दमदाटी करून गचंडी धरून चप्पलने मारहाण केले.
याप्रकरणी ग्रामसेवक रमेश खंडेराव गायके (वय 53) यांनी महिलेविरुद्ध नेवासा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादीने फिर्यादीत म्हंटले आहे कि, दिनांक 19 मार्च 2021 रोजी त्याचे कुकाणा ग्रामपंचायत कार्यलयात जात असताना आरोपी महिला आशा रोहिदास वीर (वय ४०) रा. शेवगाव हिने शिवीगाळ दमदाटी करून गाचंडी धरून चप्पलने मारहाण करून जखमी करून सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
या फिर्यादी वरून सदर महिले विरुद्ध नेवासा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तसेच यातील महिलेच्या फिर्यादी वरून ग्रामसेवक यांचा विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|