शहरात आणखी चार मायक्रो कंटेनमेंट घोषित

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 19 मार्च 2021:-जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वाढला आहे. यामुळे पुन्हा एकदा कोरोनाचे सावट जिल्ह्यावर घोगावु लागले आहे.

शहरातील कोरोनाग्रस्तांची आकडेवारी वाढल्याने महापालिकेने शहरात आज शुक्रवारी आणखी चार मायक्रो कंटेनमेंट घोषित केले.

शहरात आता एकूण 19 कंटेनमेंट झाले आहेत. नव्याने केडगाव, माणिकनगर, सारसनगर, बोल्हेगाव, सावेडीतील जयश्री कॉलनी यासह शहरात आता मायक्रो कंटेनमेंट झोनची संख्या 19 वर पोचहली आहे.

बालिकाश्रम रोड, वसंत विहार, ल्ल्डिींग 1, शहर गावठाण भागातील नागरे गल्ली येथे न्यू सौरभ एजन्सी ते अ‍ॅड. काकडे ते नमोह एजन्सी, सावेडी भागातील सावली सोसायटी, गुलमोहर रोड येथील आल्हाट यांचे घर ते लोंढे यांचे घर,

आगरकर मळा भागातील समर्थ कॉलनीमध्ये अशोक जैन घर ते प्रल्हाद जोशी घर ते गोसावी घरापर्यंत व परिसरामध्ये आजपासून ते 1 एप्रिलच्या मध्यरात्रीपर्यंत या भागात निर्बंध लागू असतील.

शहरातील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने महापालिकेने तो भाग मायक्रो कंटेनमेंट करत सील करण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या भागात कंटेनमेंट जाहीर करण्यात आला,

तेथील नागरिकांना बाहेर ये-जा करण्यास मनाई करण्यात आली असून केवळ जीवनावश्यक वस्तुंच्या अस्थापना सुरू राहणार आहेत. महापालिकेच्यावतीने कंटेनमेंट भागातील लोकांना जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जाणार आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe