अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- महाराष्ट्रात विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीये. राज्यात आज दिवसभरात कोरोनाचे तब्बल २५६८१ नवे रुग्ण आढळले आहेत.
तर आज राज्यात कोरोनामुळे एकूण ७० जणांचा मृत्यू झाला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.४२ टक्क्यांवर आले असून मृत्युदर २.२० टक्क्यांवर आला आहे.
आज शुक्रवारी १९ मार्च रोजी राज्यात दिवसभरात २५ हजार ६८१ नवे कोरोनाबाधित सापडल्यामुळे राज्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांचा आकडा आता १ लाख ७७ हजार ५६० एवढा झाला आहे.
राज्यात मागील ३ दिवसांत तब्बल ७४ हजाराहून जास्त नवे रुग्ण सापडले आहेत. पण, त्याचबरोबर आज दिवसभरात राज्यात १४ हजार ४०० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, ही एक दिलासादायक बाब ठरली आहे.
राज्यातील मृत्यूचे प्रमाण :- दरम्यान, नव्या कोरोनाबाधितांचा आकडा एकीकडे वाढत असतानाच मृतांचा आकडा देखील वाढू लागला आहे. राज्यात १५ मार्च रोजी ४८ रुग्णांचा मृत्यू झाला होता.
हाच आकडा १६ मार्च रोजी वाढून थेट ८७ वर गेला. १७ मार्च रोजी पुन्हा ८४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला. हा आकडा १८ मार्च रोजी कमी होऊन ५८ पर्यंत खाली आला होता. पण आज पुन्हा तो वाढून ७० रुग्णांचा कोरोनामुळे बळी गेल्यामुळे राज्यातील मृत्यूदर वाढून २.२० टक्क्यांपर्यंत गेला आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|