घसरण थांबली; गुंतवणूकदारांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण

Published on -

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  गेल्या पाच दिवसापासून भारतातील शेअर बाजाराचे निर्देशांक मोठ्या प्रमाणात घसरले होते. शुक्रवारी जागतिक शेअर बाजारात मंदी असूनही भारतात मात्र जोरदार खरेदी होऊन निर्देशांकात मोठ्या प्रमाणात वाढ झाली.

आजच्या सत्र व्यवहारात देशातील सर्वात जुना शेअर बाजार मुंबई शेअर बाजार 48,881.19 वर आणि राष्ट्राचे शेअर बाजार 14,471.15 वर खुला झाल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर दिवसभराच्या व्यवहारात दोन्ही निर्देशकांनी तेजी नोंदवली. आज मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 641.72 अंकांनी वधारत 49,858.24 वर स्थिरावला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी आज 186.15 अशांनी वाढत 14,477.00 च्या पातळीवर बंद झाला.

हे शेअर्स तेजीत :- मुंबई शेअर बाजारातील ओएनजीसी, डॉक्टर रेड्डीज, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, एशियन पेंट, पॉवरग्रिड, एचसीएल टेक, एनटीपीसी, बँक ऑफ बरोडा, कोटक महिंद्रा बँक, आयसीआयसीआय बँक, रिलायन्स, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक, अ‍ॅक्सिस बँक, सन फार्मा, महिंद्रा अँड महिंद्रा, एसबीआय, इंडसइंड बँक, एनटीपीसी, इन्फोसिस, आयटीसी आणि टीसीएस या कंपन्यांचे समभाग वधारले.

या शेअर्स मध्ये घसरण:-  मारुती सुझुकी, टायटन, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, महाराष्ट्र बँक, बजाज ऑटो, सेंट्रल बँक या कंपन्यांचे समभाग घसरल्याचे पाहायला मिळाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe

Latest News