ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देताच पोलिसांनी उचलले आक्रमक पाऊल

Ahmednagarlive24
Updated:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:-  पाथर्डी तालुक्यातील मिरी येथे चोर्‍यांचे प्रमाण वाढल्याने व रात्रीच नव्हे तर भरदिवसा देखील या गावात घरफोड्या होऊ लागल्याने हे सर्व प्रकार अवैध धंद्यांमुळेच होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

त्यामुळे गावातील सर्व अवैध धंदे तात्काळ बंद करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी मिरी येथील सर्व अवैध धंदे पोलिसांकडून बंद करण्यात आल्याने

नागरिकांमध्ये समानधनाचे वातावरण आहे. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून गेल्या अनेक दिवसांपासून मिरी येथे चक्रीसारखा ऑनलाईन मटका मोठ्या प्रमाणात सुरू होता.

गावातील तरुण या चक्राच्या चक्रव्यूहात अडकल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन हे सर्व अवैध धंदे बंद करण्याची मागणी लेखी निवेदनाद्वारे पोलीस अधिक्षकांकडे केली होती.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी मिरी गावात खुलेआमपणे सुरू असलेले चक्री मटका, जुगार, अवैध दारू विक्री व इतर अवैध धंदे बंद केले आहेत.

आता हे अवैध धंदे कायमचे बंद होतात की पुन्हा कोणाच्या आशीर्वादाने हळूहळू सुरू करण्याचा प्रयत्न होतोय. याकडे देखील तक्रारदार ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe