अहमदनगर जिल्ह्यातील ‘या’ गावात कडक लॉकडाऊन! तीन दिवसात आढळले तब्बल ३४ रुग्ण

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- अखेर ज्या गोष्टीची भीती वाटत होती शेवटी तीच झाली. तालुक्यातील दिघोळ या गावात तीन दिवसात तब्बल ४२ कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी या गावात अत्यावश्यक सेवा वगळता पंधरा दिवसांचा कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे.

तालुक्यासाठी चिंता वाढवणारी गोष्ट म्हणजे सध्या जामखेड तालुक्यात एकूण ४५ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. मागील दोन महिने थंडावलेला कोरोना जामखेड तालुक्यात पुन्हा एकदा सक्रीय होऊ लागला आहे.

विशेष म्हणजे आता कोरोना बाधितांची संख्या ही शहरापेक्षा ग्रामीण भागात जास्त आढळुन येत आहेत. ग्रामीण भागातील दिघोळ येथे कोरोनाचा उद्रेक पहायला मिळाला असून,

गेल्या दोन दिवसांत ८८ जणांच्या कोरोना तपासण्या केल्या यामध्ये पंधरा रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तसेच पाडळी गावात ९ तर सावरगाव या ठिकाणी ४ रुग्ण आढळून आले आहेत.

दिघोळ या गावी तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी हॉटस्पॉट घोषित केले असुन, पुढील पंधरा दिवस अत्यावश्यक सेवा वगळता कडक लॉकडाउन करण्यात आला आहे. गावातील रस्ते बंद करून एकच रस्ता ठेवण्यात आला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe