हैदराबाद : तेलंगणामध्ये भरलग्नातच वधू आणि वरपक्षामध्ये शाब्दिक वादानंतर पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्याने एकच खळबळ उडाली आहे. या राड्यात तिघे जण जखमी झाले आहेत. तेलंगणच्या सूर्यपेट जिल्ह्यातील लग्नसोहळ्यात हा राडा झालाय.
कोदाद मंडलमध्ये राहणाऱ्या अजयचा विवाह आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील इंद्रजासोबत पार पडला. सुरुवातीला वधू आणि वर पक्षाची मंडळी खुशीत होती, मात्र गावात लग्नाची वरात काढण्यावरुन त्यांच्यामध्ये वादाची ठिणगी पडली.

सांगलीत पतीकडून खुरप्याने वार करत पत्नीची हत्या शाब्दिक वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. दोन्ही बाजूच्या पाहुणे मंडळींनी एकमेकांवर खुर्च्या फेकून मारल्या. कोदाद ग्रामीण पोलिस स्टेशनचे सर्कल निरीक्षक शिवा राम रेड्डी यांनी ही माहिती दिली.
पोलिस घटनास्थळी पोहचले, त्यावेळी तीन वऱ्हाडी जखमी झालेले होते. त्यांना उपचारासाठी स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं. लग्नानतर दोन्ही बाजूचे नातेवाईक पोलिस स्टेशनमध्ये आले. अजय आणि इंद्रजा या जोडप्यामध्ये कुठलेही वाद नसून ते एकत्र राहत आहेत. त्यामुळे आम्हाला तक्रार नोंदवायची नाही, असं नातेवाईकांनी पोलिसांना सांगितलं.
- महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या पर्यटकांसाठी प्रशासनाचा मोठा निर्णय !
- ‘हे’ झाड चुकूनही घराशेजारी लावू नका, नाहीतर साप तुमच्या घरीच मुक्कामाला असणार; या झाडाला म्हणतात सापाचे दुसरे घर
- MCX Report : सोन्याच्या वायद्यात ३,२२१ रुपये आणि चांदीच्या वायद्यात ३,४४२ रुपयांची वाढ
- टाटा मोटर्सचा मास्टरप्लॅन ! 2025 मध्ये नव्या सात गाड्या लाँच करण्याची तयारी, पहा संपूर्ण यादी
- DRDO Bharti 2025: संरक्षण संशोधन व विकास संघटना अंतर्गत सायंटिस्ट पदाची भरती सुरू; त्वरित अर्ज करा