अहमदनगर Live24 टीम, 20 मार्च 2021:- आज राज्यभरात कोरोनाचे प्रचंड वेगाने रूग्ण वाढत आहेत. ते आटाक्यात आनण्यासाठी प्रशासन युध्दपातळीवर प्रयत्न करत आहे. मात्र अजुनही काहीजण कोरोनाबाबत गंभीर नसल्याचे वास्तव समोर आले आहे.
जामखेड तालुक्यातील दिघोळ गावात कोरोनाने कहर केला असून, या गावात चार दिवसात तब्बल ५४ कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संपूर्ण गावच लॉकडाउन केले आहे.
या बाबत माहिती अशी की, मागील आठवड्यात दिघोळ गावातील लोक पुणे येथे एका लग्नसोहळाला गेले होते. तेथील लग्नात ते कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात आल्याने लग्नाला गेलेले सर्व लोक कोरोनाचा वानोळा घेऊन दिघोळ येथे आल्यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भाव अचानक वाढला.
मागील चार दिवसांत तब्बल ५४ रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने दिघोळ गावाच्या परिसरातील गावे व खर्डा शहरातील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. सध्या दिघोळ हे गाव संपूर्णपणे लॉकडाऊन करण्यात आले असून, प्रशासनाकडून सर्व सतर्कता बाळगली जात आहे. दररोज टेस्टिंग घेण्यात येत आहेत.
मात्र हळूहळू रुग्ण वाढत चालल्याने दिघोळकरांच्या चिंतेत भर पडत चालली आहे. या पार्श्वभूमीवर परिसरातील गावातील लोकांनी मास्क वापरूनच घराबाहेर पडावे व गर्दीच्या ठिकाणी लोकांनी जाऊ नये असे आवाहन तहसीलदार विशाल नाईकवाडे यांनी केले आहे.
- ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
- अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|