बीड: महाविद्यालयात शिकणाऱ्या सारिका दादासाहेब शिंदे (वय-18) या तरुणीने क्लासेस लावण्यासाठी पैसे नसल्याने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सारिकाने विषप्राशन केल्याचे समजताच तिला नातेवाईकांनी रुग्णालयात नेले.
हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतरही तिथे डॉक्टर उपलब्ध नसल्याने तिचा उपचाराचाअभावी मृत्यू झाल्याचा आरोप सारिकाच्या नातेवाईकांनी केला आहे.

गेवराई तालुक्यतील कोळगाव येथे ही घटना घडली. सारीका शिंदे ही चलकंबा येथील 12 ची विद्यार्थिनी होती. सारिकाला अहमदनगर येथील आर्मी कॉलेजमध्ये क्लास लावायचा होता. मात्र, घरची परिस्थिती हलाखीची असल्याने तिला क्लासचे पैसे भरता आले नाही.
त्यामुळे ती नाराज होती. याच नैराश्येतून तिने शु्क्रवारी सकाळी राहत्या घरी सकाळी साडे नऊच्या सुमारास विषारी औषध प्राशन केले. घरच्यांना हा प्रकार समजताच तिला गेवराई येथे उपचारासाठी हलवण्यात आले.
मात्र, सारिकाची प्रकृती जास्त खालावल्याने तिला बीड जिल्हा रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. अॅम्बुलन्स न मिळाल्याने तिला खासगी गाडीने हॉस्पिटलमध्ये नेताना शहरातील साठे चौकातील ट्राफिक पोलिसांनी गाडी अडवून चौकशी सुरु केली.
विनंती करुन देखील लवकर सोडले नाही. 10 मिनिटे तिथेच वाया गेले. पोलिसांनी गाडी लवकर सोडली असती तर सारिकाचा जीव वाचला असता, असे तिच्या वडिलांनी सांगितले. तसेच जिल्हा रुग्णालयात सारिकाला दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे सारिकाचा उपचाराअभावी मृत्यू झाला.
- नगर मनमाड रस्त्याचे काम सुरू झाल्याने खा. नीलेश लंके यांचे उपोषण मागे ! प्रकल्प अधिकाऱ्यांचे लेखी आश्वासन
- माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी घेतली गटार दुर्घटनेत मृत पावलेल्या पवार व पिंजारी कुटुंबीयांची भेट
- NHPC Apprentice Job 2025: नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत 361 रिक्त जागांसाठी भरती सुरू; जाणून घ्या शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती…
- श्रीरामपूर शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामास गती द्यावी – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील
- भारतातील सर्वात मोठा जिल्हा कोणता?, कोणत्या राज्यात किती जिल्हे?, पाहा आकडेवारी