अहमदनगर : महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याच्या व पुतळा परिसर सुशोभिकरणाच्या कामास लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती महापौर बाबासाहेब वाकळे यांनी दिली. या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
महापालिकेच्या आवारात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्याचा ठराव महासभेत दोन वर्षापुर्वी झालेला आहे. मात्र त्यानंतर काहीही कार्यवाही झालेली नाही. या संदर्भात मनपाच्या सर्वसाधारण सभेत नगरसेवक कुमार वाकळे,

सभागृहनेते स्वप्नील शिंदे, संपत बारस्कर, मनोज कोतकर यांच्यासह ११ शिवप्रेमी संघटनांच्यावतीने सदर पुतळा तातडीने बसविण्याची कार्यवाही करावी अशी मागणी करून सदर पुतळ्याचे काम प्रगतीपथावर न आल्यास १९ फेब्रुवारी २०२० रोजी शिवजयंतीच्या दिवशी मनपाच्या आवारात आत्मदहन करण्याचा इशारा दिला होता.
दोन वर्षापुर्वी महापालिकेच्या आवारात शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यास मनपाच्या सभागृहाने मंजुरी दिलेली आहे.मात्र त्याच्या परवानगीसाठी मोठा कालावधी निघून गेला.या ठरावाची अंमलबजावणी अद्यापि झाली नसल्याचे कुमार वाकळे यांनी निदर्शनास आणून दिले होते.
यासंदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे यांनी शनिवारी (दि.२) दुपारी नगरसेवक कुमार वाकळे, संपत बारस्कर, मनोज कोतकर, अजिंक्य बोरकर, संजय घुले, मुन्ना शेख, अभियंता सुरेश इथापे, आर्किटेक्ट शरद लाटे यांच्या समवेत नियोजित जागेची पाहणी करून या पुतळ्यासाठीचा आराखडा आणि अंदाजपत्रक तातडीने तयार करण्याच्या सूचनाही आर्किटेक्ट शरद लाटे यांना दिल्या.
कार्यालयीन कार्यवाही पूर्ण होताच लवकरात लवकर पुतळ्याचे काम सुरु करण्यात येईल असे महापौर वाकळे यांनी सांगितले
- राज्यातील सोयाबीन आणि हरभरा उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! सरकार लवकरच घेणार ‘हा’ मोठा निर्णय
- महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी बातमी ! बोर्ड परीक्षा आधी विद्यार्थ्यांना….
- पुणे रिंगरोड व तळेगाव–चाकण–शिक्रापूर महामार्गाच्या कामासाठी डेडलाइन जाहीर ! कधीपर्यंत पूर्ण होणार काम? वाचा….
- SBI ची FD योजना बनवणार मालामाल ! २ लाख रुपयांच्या गुंतवणुकीतून मिळणार ८४ हजाराचे व्याज
- पहिली ते पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी ! पुढील आदेश निघेपर्यंत शाळा बंद राहणार, शिक्षण विभागाचा सर्वात मोठा निर्णय













