जिल्हा परिषदेत होतेय लॉकडाऊनची मागणी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  जिल्ह्यातील एक महत्वाचे कार्यालय म्हणून पहिले जाणारे नगर शहरातील जिल्हा परिषेदत नुकताच कोरोनाने शिरकाव केला आहे. झेडपीमध्ये आता करोना बाधितांची संख्या 10 झाली आहे.

यात दोन पदाधिकार्‍यांच्या स्वीय सहाय्यकांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्यालयात गेल्या काही महिन्यांपूर्वी करोना हद्दपार झालेला होता.

मात्र, पाच ते सहा दिवसांपासून मुख्यालयात लेखापरीक्षणाच्या नावाखाली कर्मचार्‍यांची गर्दी वाढली आहे. या होणार्‍या गर्दीतून करोनाचा संसर्ग वाढल्याची शंका आता कर्मचारीच उपस्थित करत आहेत.

जिल्हा प्रशासनाने शासकीय कार्यालयात 50 टक्के उपस्थितीचा निर्णय घेतल्यानंतर ही जिल्हा परिषद प्रशासनाने उशीराने याबाबत आदेश काढले असल्याचे कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे.

दोन दिवसांपूर्वी जिल्हा परिषदेत पाच करोना बाधित कर्मचारी होते. आता त्यात पाचची वाढ झाली आहे. यामुळे बाधित कर्मचार्‍यांची संख्या आता 10 झाली आहे.

यामुळे सोमवारपासून जिल्हा परिषदेत लॉकडाऊनची मागणी होत आहे. करोनामुळे आधीच दोन जिल्हा परिषद सदस्यांसह एक अधिकारी आणि काही कर्मचारी यांना जीव गमवावा लागला असून नव्याने करोना रुग्ण वाढत असल्याने कर्मचार्‍यांचा जीव टांगणीला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe