परमबीर प्रकरणात महाराष्ट्र सरकारच्या शिल्पकारांना जाब विचारायला हवा

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपात तथ्य असल्यास आणि त्याचे दावे खरे असल्यास आदरणीय शरद पवारजींना जाब विचारायला हवा.

कारण तेच महाराष्ट्र सरकारचे शिल्पकार आहेत, असं काँग्रेस नेते संजय निरूमप यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात निरूपम यांनी ट्विट केलं आहे. यासोबतच त्यांनी तथाकथित आघाडीवरून सवाल केल आहे.

तथाकथित तिसरी आघाडी हेच करणार आहे का?, असा सवाल निरुपम यांनी उपस्थित केला आहे. काँग्रेसनं या विषयात ठाम भूमिका घ्यायला हवी, असंही संजय निरूमप यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपाच्या पत्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि शरद पवार यांचाही उल्लेख आहे.

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या भ्रष्ट कारभाराबद्दल शरद पवार, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पूर्वीच कल्पना दिली होती.

मात्र त्यांना याबाबत आधीपासूनच या सगळ्याची कल्पना असल्याचं परमबीर सिंह यांनी पत्रात म्हटलं आहे. विरोधकांनी हे प्रकरण लावून धरलं असून

गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. मात्र अशातच काँग्रेस नेते संजय निरूपम यांनी या प्रकरणावरून थेट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe