अहमदनगर : वाहतुकीचे नियमन करत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्यास सांगितल्याचा राग येवून त्यास शिवीगाळ केल्याची घटना जामखेडमध्ये घडली.
याप्रकरणी नागेश अशोक गवळी, अशोक मारूती गवळी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर असे की, रॅलीमुळे झालेली वाहतूक कोंडी कमी करत असताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्याचे सांगितल्याने नागेश अशोक गवळी व अशोक मारूती गवळी या दोघांनी पोलिस कर्मचारी यादव जीवन चव्हाण यांना अश्लील भाषेत शिवीगाळ करून त्यांना धक्काबुक्की करून कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांशी झटापट केली.
याप्रकरणी चव्हाण यांच्या फिर्यादीवरून या दोघांविरूध्द सरकारी कामात अडथळा आनल्याचा गुन्हा दाखल केला आहे.याबाबत अधिक तपास सपोनि.चव्हाण हे करत आहेत.
- Jio Prepaid Users साठी खास बातमी! स्वस्त 11 रुपयांपासून 359 रुपयांपर्यंतचे डेटा व्हाउचर्स, फायदे जाणून घ्या
- केंद्रीय संस्कृत विद्यापीठात ४३ शिक्षकेतर पदांची भरती; पगार १.८२ लाखांपर्यंत
- अर्थसंकल्पाच्या दिवशीच सर्वसामान्यांना महागाईचा धक्का; एलपीजी गॅस सिलेंडर ५० रुपयांनी महाग
- सुपरहिट सुरुवात! महिन्याचा पहिलाच दिवस ‘या’ राशींसाठी ठरणार खास; आयुष्याला नवी दिशा मिळणार
- 200MP कॅमेरा + 7600mAh बॅटरी! iQOO 15R चार वर्षे अगदी नवा राहणारा फोन !













