सरकारच्या मंत्र्यांचे केवळ ‘उपभोगा’कडेच लक्ष! सरकारविरोधात भाजपाची प्रचंड घोषणाबाजी

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:-  राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाझे यांना दर महिन्याला १०० कोटी रुपये गोळा करण्याचे टार्गेट दिले होते. असे विधान मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केले. ही बाब गंभीर असून या घटनेचा आम्ही निषेध करत आहोत.

या सरकारचा आपल्या मंत्र्यावर कोणताही वचक राहिला नसून, प्रत्येक मंत्री आपल्यासच धुंदीत आहे. भ्रष्टाचार, बलात्कार, खून, दरोडे असे प्रकार सरकारमधील सहभागी मंत्री, आमदारांकडून होत आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीच अधिकार नाही.

सत्तेचा दुरुपयोग करुन ‘उपभोग’ घेण्याकडेच मंत्र्याचे लक्ष आहे. जनतेचे त्यांना काहीही देणे घेणे नाही. सध्या जगभर कोरोनाने थैमान घातले असून, त्यामुळे अनेकांची नोकरी, रोजगार, कामधंदे बुडाले आहेत. जनता औषधावचून मरत आहे, परंतु हे सरकार फक्त आपल्या फायद्यासाठी अनेकांचे बळी देत आहेत.

कोरोनाची भिती घालून यांचे अनाधिकृत उद्योग सुरु आहेत. दिवसेंदिवसे सरकारमधील एक-एक मंत्र्यांची नावे विविध प्रकारणातून पुढे येत आहेत. हे सरकार जनतेसाठी काम करत नसून स्वत:च्या फायद्यासाठी काम करत आहेत. त्यामुळे या सरकारला सत्तेत राहण्याचा काहीही अधिकार नाही, असा घणाघाती आरोप भाजपा शहर जिल्हाध्यक्ष भैय्या गंधे यांनी केला.

शहर जिल्हा भाजपाच्यावतीने प्रोफेसर कॉलनी चौकात आघाडी सरकारच्या विरोधात तीव्र घोषणाबाजी करुन निदर्शने करण्यात आली. याप्रसंगी महापौर बाबासाहेब वाकळे  म्हणाले, आज जनता कोरोना, वीज बील, महागाईने होरपळत असतांना नागरिकांना दिलासा देण्याऐवजी हे सरकार मधील मंत्र्यांचे एक-एक कारनामे बाहेर येत आहेत.

काही दिवसांपूर्वीच एका मंत्र्यांचा राजीनामा घेण्यात आला. तर आता सध्याचे गृहमंत्री हे पोलिसांकरवी हप्ते गोळा करण्याचे काम करत आहेत, आणि विशेष म्हणजे ही बाब माजी पोलिस आयुक्तांनी निदर्शनास आणुन दिली हे महत्वाचे आहे.यातून हेच दिसून येते.

त्यामुळे सरकार भ्रष्टाचार करण्यातच गुंतले आहे, त्यामुळे या सरकारला सत्तेवर राहण्याचा काहीएक अधिकार नाही.  असे म्हणाले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe