अहमदनगर ब्रेकिंग : पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार !

Ahmednagarlive24
Published:

अहमदनगर Live24 टीम, 21 मार्च 2021:- जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील तळेगाव दिघे येथील बाजारतळानजीक असलेल्या पुलावर मालवाहू ट्रकने दुचाकीला जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात पोलीस हेड कॉन्स्टेबल जागीच ठार झाले.

एकनाथ रामकृष्ण बर्वे ( ४८ वर्ष ) असे त्यांचे नाव आहे. लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्यावर तळेगाव दिघे गावानजीक शनिवारी ( दि. २० ) सायंकाळी ६.१५ वाजेच्या सुमारास ही अपघाताची घटना घडली.

हेड कॉन्स्टेबल एकनाथ रामकृष्ण बर्वे हे लोणी ते नांदूरशिंगोटे रस्त्याने दुचाकीवरून ( एमएच १७, सीबी ८६९७ ) प्रवास करीत असताना तळेगाव दिघे येथील बाजार तळानजीकच्या पुलावर पाठीमागून आलेल्या मालवाहू ट्रकने ( केए ३२, सी ५१६६ ) त्यांच्या दुचाकीला धडक दिल्याने अपघात झाला.

या अपघातात एकनाथ बर्वे यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकी चालवत असताना बर्वे यांनी हेल्मेट घातलेले होते, मात्र अपघातात हेल्मेट दूर जावून पडले.

कनाथ बर्वे यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला. अपघातास कारणीभूत चालक मालवाहू ट्रक नजीकच रस्त्याच्याकडेला लावून पसार झाला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर
महत्वपूर्ण बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe