श्रीगोंदा : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे केवळ हालच झाले नाही तर मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी आपण स्वत: उभे आहोत. शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण व अडीअडचणी समजून घेण्यासाठी श्रीगोंदा तहसील कार्यालयात आपल्या सुचनेवरून तक्रार निवारण कक्ष सुरू करण्यात आल्याची माहिती आमदार बबनराव पाचपुते यांनी दिली.
श्रीगोंदा पंचायत समितीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आ.पाचपुते बोलत होते. ते म्हणाले की, आपण मुंबई वरून आल्यानंतर थेट शेतकऱ्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या.

नुकसानग्रस्त भागात प्रशासकीय अधिकाऱ्याना सोबत घेऊन पाहणी केली. यात प्रामुख्याने कांदा, द्राक्ष, डाळिंब, तूर, मका, सोयाबीन, कापूस आदींचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त भागात तातडीने पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
पंचनामे करण्यास कर्मचारी कमी पडल्यास इतर विभागातील कर्मचारी देखील या कामात घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्य सरकार नुकसानभरपाई देण्यासाठी सकारात्मक असून शेतकऱ्यांना भरपाई मिळून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील.
कृषी विभागाच्या प्राथमिक अंदाजात २८ हजार ६८५ हेक्कटर बाधित झाल्याची माहिती आहे. शासनाला हा सर्व अहवाल सादर झाल्यानंतर लवकरात लवर मदत मिळवून देण्यास आपण कटिबद्ध आहोत.
असेही आ.पाचपुते यावेळी म्हणाले. या प्रसंगी गटविकास अधिकारी प्रशांत काळे, कृषी अधिकारी पदमनाभ म्हस्के, सभापती शाहजी हिरवे, विठ्ठलराव काकडे, शंकर कोठारे, बाळासाहेब महाडिक, संतोष लगड, बापूसाहेब गोरे, अशोक खेंडके आदी उपस्थित होते.
- मुंबई ते गोवा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी गोड बातमी ! वंदे भारत एक्सप्रेस आणि तेजस एक्सप्रेस मध्ये मिळणार….
- IBPS Clerk Jobs 2025: IBPS अंतर्गत ‘लिपिक’ पदाची मेगा भरती! 10,277 जागांसाठी भरती सुरू; लगेच अर्ज करा
- एलपीजी गॅस एजन्सी सुरू करा, दर महिन्याला होणार लाखो रुपयांची कमाई ! एका सिलेंडर मागे किती कमिशन मिळते? पहा…
- पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (PPF) मध्ये गुंतवणूक करताना ‘या’ 7 टिप्स फॉलो करा ! आयुष्यभर पैशांचे टेन्शन राहणार नाही
- अकोले तालुक्यात बाल लैंगिक अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी तालुका बाल संरक्षण समितीची स्थापना